रत्नागिरी : आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट..

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू होऊन अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. निवडणुकीच्या कामात अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषद भवनात शुकशुकाट पसरला आहे. यामुळे नागरिकांच्याही कामाचा खोळंबा होऊ लागला आहे.

विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतर अनेक शासकीय कार्यालयांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक निवडणुकीच्या कामासाठी करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व शासकीय योजना व विकासकामे बंद असल्याने शासकीय कार्यालयांमधील नागरिक व ठेकेदारांची वर्दळ घटली आहे. जिल्हा परिषदेतही हेच चित्र असून, आचारसंहिता लागल्यापासून सर्वच विभागांत शुकशुकाट आहे. आचारसंहितेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण आहे. मात्र, कार्यालयीन कामकाजातून जराशी विश्रांती मिळते ना मिळते तोच निवडणूक कामासाठी आयोगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऑर्डर काढल्या आहेत. त्यामुळे या निवडणूक कामासाठी हे कर्मचारी हजर झाले आहेत.

आचारसंहितेचा कंत्राटी शिक्षक भरतीला फटका
शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये बीएड, डीएड शिक्षक बेरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक देण्याचा निर्णय ५ सप्टेंबर रोजीच घेतला. त्यानुसार आदेश काढला गेल व कार्यवाहीही सुरू झाली. पहिल्या टप्प्यात १०४ जणांना घेतले सुद्धा मात्र उर्वरीत ५०० जणांच्या नियुक्त्या देण्याचे काम सुरु असताना आचारसंहिता लागल्याने ही भरती प्रक्रिया रखडली आहे. आचारसंहिता झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:03 PM 25/Oct/2024

Infigo Eyecare