सावंतवाडी दिवा, नेत्रावती एक्स्प्रेसच्या वेळेत १ नोव्हेंबरपासून बदल

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस तसेच नेत्रावती एक्स्प्रेसच्या वेळेत येत्या १ नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. गाड्यांच्या वेगातही वाढ होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक संपून या मार्गावरील गाड्या नियमित वेळापत्रकानुसार धावणार असल्याने हा बदल होणार आहे. दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणारी एक्स्प्रेस (10105) ही गाडी रत्नागिरी स्थानकावर सध्या सुरू असलेल्या पावसाळी वेळापत्रकाच्या तुलनेत २० मिनिटे आधी म्हणजे २ वाजून ५ मिनिटांनी येणार आहे. सध्या पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी येत होती.

या गाडीबरोबरच रत्नागिरी ते दिवा दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेस गाडीच्या वेळेतदेखील थोडासा बदल होणार आहे.

याशिवाय कोकण रेल्वे मार्गे धावणारी 16345 क्रमांकाची नेत्रावती एक्स्प्रेस गाडी १ नोव्हेंबरपासून नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक संपत असल्याने प्रवाशांनी त्यांच्या गाड्यांची वेळ तपासूनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे,असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Infigo eyecare

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:52 PM 24/Oct/2024