Breaking : अभूतपूर्व गर्दी…गर्दीचे सर्व विक्रम मोडले…उदय सामंत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

आज सकाळी १० वजाता प्रथम स्वयंवर मंगल कार्यालय येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला देखील बीजेपी पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. या सभेमध्ये बीजेपीचे नेते रवींद्र चव्हाण यांनी बाळ माने यांचा उल्लेख गद्दार असा करीत यांना पक्षाने काय नाही दिले ? असा प्रश्न विचारला. बीजेपीच्या सर्व मतदारांनी उदय सामंत यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन यावेळी रवींद्र चव्हाण यांनी केले.

त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ येऊन ठेपल्याने शिव पुतळ्याला हार घालून उदय सामंत प्रथम उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले. हा अर्ज दाखल करून झाल्यावर सामंत हॉटेल विवेक येथील विराट सभेत आले. या सभेने गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत काढले. लाडक्या बहिणींची संख्या तर प्रचंड मोठी होती. रत्नागिरीच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा म्हणून या सभेची नोंद झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 25-10-2024

Tata sierra