चिपळूण : खेर्डीच्या उपसरपंचपदी वैशाली केतन मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अभिजित खताते यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक झाली. सुखाई परिवर्तन पॅनेलतर्फे खताते यांचा सत्कार करण्यात आला.
खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुखाई परिवर्तन पॅनेलने एकहाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर सरपंचपदासह उपसरपंचपदी पॅनेलमधील विविध सदस्यांना सधी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी उपसरपंच अभिजित खताते यांनी पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक घेण्यात आली. सरपंच सुगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. उपसरपंचपदी वैशाली केतन मोरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मोरे यांची निवड होताच जयंद्रथ खताते यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्नेहा मेस्त्री, सरपंच सुगंधा माळी, प्रकाश पाथरूड, वृंदा दाते, अपर्णा दाते, अश्विनी पंडित, विनोद भुरण, विजय शिर्के, अभिजित खाताते, सुप्रिया उतेकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 27/Nov/2025














