मावळंगे येथील तरुणाचे विषप्राशन

रत्नागिरी : तालुक्यातील मावळंगे येथील तरुणाने अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. ही घटना शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

शैलेश श्रीकांत मांडवकर (२७, रा. मावळंगे, रत्नागिरी) असे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचे नाव आहे. शैलेशने शुक्रवारी रात्री राहत्या घरी अज्ञात कारणातून आंबा फवारणीचे औषध प्राशन केले. त्या नंतर शनिवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी त्याला अस्वस्थ वाटू लागल्यावर त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 28-10-2024

Shanti real estate 1