देवरूखमध्ये ३१ रोजी रंगणार दिवाळी मैफल

देवरुख : शहरातील अभिरुची संस्थेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ३१ रोजी दिवाळी मैफल होणार आहे. ही मैफल विशारद गुरव सजवणार आहेत. येथील द्विभुज गणेश मंदिराच्या चांदोरकर सभागृहात रात्री ९.३० वा. हा कार्यक्रम होणार असून, याला तबला साथ अथर्व आठल्ये व संवादिनी साथ चैतन्य पटवर्धन यांची लाभणार आहे. प्रतिवर्षी अभिरूची संस्था संगीत प्रेमींची दिवाळी शास्त्रीय संगीताच्या मेजवानीने आनंदी करत असते. गेली अनेक वर्षे संस्था दिवाळी मैफल साजरी करत आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम संगीत अशी ही मैफल होत असते. या मैफलीचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष आशिष प्रभुदेसाई यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 28/Oct/2024

Ratnagiri Khabardar add image