Ratnagiri : विधानसभा निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेले खर्च निरीक्षक, पोलीस निरीक्षकांसह २ सर्वसाधारण निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी पुरुषोत्तम कुमार खर्च निरीक्षक, राजेंद्र प्रसाद मीना पोलीस निरीक्षक असतील.

दापोली आणि गुहागर मतदारसंघासाठी सुमित जरांगल सर्वसाधारण निरीक्षक, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूरसाठी जनक प्रसाद पाठक हे सर्वसाधारण निरीक्षक म्हणून दाखल झाले आहेत.

या निरीक्षकांना भेटण्यासाठी त्यांचे संपर्क क्रमांक आणि ठिकाण असे – पुरुषोत्तम कुमार (आयआरएस) – सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी खर्च निरीक्षक – संपर्क क्रमांक 8149467650, ठिकाण – शासकीय विश्रामगृह, माळ नाका, रत्नागिरी

Mahrashi karve ANM

दापोली, गुहागरचे सर्वसाधारण निरीक्षक सुमित के. जरांगल (आयएएस) – संपर्क क्रमांक 8149277989, ठिकाण – शासकीय विश्रामगृह, माळ नाका, रत्नागिरी.

चिपळूण, रत्नागिरी राजापूरचे सर्वसाधारण निरीक्षक जनक प्रसाद पाठक (आयएएस) संपर्क क्रमांक -7823012267, ठिकाण – शासकीय विश्रामगृह, माळ नाका रत्नागिरी

सर्व विधानसभा मतदार संघासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रसाद मीना (आयपीएस) संपर्क क्रमाक 9307962285, ठिकाण – शासकीय विश्रामगृह, माळ नाका, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 29-10-2024