Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ची आता प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय; ‘या’ बाबी तपसल्या जाणार

मुंबई: Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करताना काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी माहिती ही एक्स या समाज माध्यमावर दिली. लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई केवायसीची मुदत देण्यात आली होती.

योजनेचे संकेतस्थळ बंद

लाडकी बहीण योजनेचे संकेतस्थळ बंद असल्याने राज्यातील लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीमधील त्रुटींची पूर्तता रखडली आहे. वाशिमसह राज्यातील अनेक लाभार्थींच्या ई-केवायसीमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांचे अनुदान थांबले आहे.

Khabardar diwali fest

‘या’ बाबी तपासणार

लाभार्थी महिलेचे वय २१ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे, लाभार्थी पात्र महिलाच असावी, तिचा पती सरकारी कर्मचारी नसावा, याचीही पडताळणी केली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 22-01-2026