उदय बनेंनी घेतला उमेदवारी अर्ज

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभेची उमेदवारी डावललेले नाराज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उदय बने यांची नाराजी कायम आहे, शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यावरही त्यांनी सोमवारी बहिष्कार टाकला.

उमेदवारी अर्जदेखील ते घेऊन गेल्याने आज (ता. २९) अखेरच्या दिवशी ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरून शिवसेना ठाकरे गटाला धक्का देणार काय? अशी चर्चा सुरू आहे. रत्नागिरीच्या राजकारणात भुवया उंचावणाऱ्या घडामोडी होत आहेत. चाळीस वर्षे शिवसेनेशी (ठाकरे गटात) एकनिष्ठ राहिलेले उदय बने रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून इच्छुक होते. तसे त्यांनी पक्षालाही कळवले होते. याची पूर्ण तयारीही त्यांनी केली होती; परंतु या दरम्यान भाजपचे बाळ माने यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांनी उमेदवारीही जाहीर केली, मातोश्रीचा हा निर्णय निष्ठावंतांसाठी धक्कादायक होता. बने आणि त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागणारा हा निर्णय होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 29-10-2024

Arihant 4