चिपळूण : कळंवडेतील हातभट्टीवर छापा

चिपळूण : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यावसायिकांवर चिपळूण पोलिसांचे छापासत्र सुरू केले आहे. त्यानुसार रविवारी तालुक्यातील कळंबडे वरपेवाडी येथे गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा टाकण्यात आला. यावेळी १ लाख ४३ हजार ८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका तरुणावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नंदेश सदाशिव वरपे (वय २४, कळंवडे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पोलिस पांडुरंग शिवाजी पाटील (४७, चिपळूण) यांनी दिली आहे. तालुक्यातील कळवडे वरपेवाडी येथील धरणाच्या शेजारील वहाळाच्या किनारी झाडीझुडपाच्या आडोशाला गैरकायदा गावठी दारू गाळण्यासाठी हातभट्टी बांधून त्याद्वारे गावठी दारू गाळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकण्यात आला. त्यामध्ये वरपे याला पोलिसांनी रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. येथील कारवाईत गूळ, कुजके रसायन, गावठी हातभट्टीची दारू आदींसह १ लाख ४३ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच हातभट्टीदेखील उध्वस्त करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 29/Oct/2024

Ratnagiri Khabardar add image