राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार

Jun 13, 2024 - 09:54
 0
राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार

पुणे : राज्यात सध्या मान्सूनचा पाऊस चांगलाच बरसत आहे. मात्र, त्याचा जोर कमी आहे. आता मात्र पुढील दोन दिवस कोकणात मुसळधार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने वादळी वाऱ्यांसह काही भागांत मुसळधार पाऊस बरसणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मान्सूनची गती योग्य दिशेने सुरू असून, पोषक वातावरणामुळे मान्सूनची आगेकूच सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस कोकणात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस बरसणार आहे; तर विदर्भात मात्र १७ ते १८ जूनपर्यंत पावसाचा जोर राहणार आहे. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 13-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow