चिपळूण : मैदान गाजविणाऱ्या कोकणातील दोन खेळाडूंची क्रीडा विकासावर दिलखुलास चर्चा

Jun 13, 2024 - 11:04
Jun 13, 2024 - 15:52
 0
चिपळूण : मैदान गाजविणाऱ्या कोकणातील दोन खेळाडूंची क्रीडा विकासावर  दिलखुलास  चर्चा

चिपळूण : वेगवेगळी मैदाने गाजविणारे कोकणातील दोन खेळाडुंची बुधवारी भेट झाली. या भेटीत दोन्ही खेळाडुंनी गत आठवणींना उजाळा देत दिलखुलास गप्पा मारल्या. राजकीय मैदानात ठाम उभे राहणारे चिपळूण- संगमेश्वर विधानसभेचे आ. शेखर निकम तर क्रिकेटच्या मैदानात यष्टीच्या मागे गोलंदाजाची भिंत म्हणून उभे राहणारे भारतीय क्रिकेट संघातील कोकणचे सुपुत्र चंद्रकांत पंडित यांची बुधवारी सावर्डे येथे आ. निकम यांच्या कार्यालयात भेट झाली. 

यावेळी दोघांनीही आपापल्या क्षेत्रातील मैदानावर केलेल्या कामांची दिलखुलास चर्चा केली. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. सर्व राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी व प्रमुख नेते निवांतपणाचा क्षण अनुभवत आहेत. आ. निकमदेखील आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त झाले आहेत. याचवेळी भारतीय क्रिकेट संघातील माजी यष्टीरक्षक चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावचे सुपुत्र चंद्रकांत पंडित हे बुधवारी वैयक्तिक कामानिमित्त गावी आले होते.

दरम्यान, त्यांनी राजकीय मैदानावर ठसा उमटविणाऱ्या आ. शेखर निकम यांची भेट घेऊन विविध विषयावरून दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील विकसित होणारी मैदाने, नव्याने तयार करण्यात येणाऱ्या खेळपट्ट्या, तालुका क्रीडा संकुल या संदर्भात त्यांनी चर्चा केली व चंद्रकांत पंडित यांचे मार्गदर्शनदेखील घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:18 PM 13/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow