तब्बल 25 वर्षानंतर अजिंक्य देव, अश्विनी भावे दिसणार एकत्र

Jun 13, 2024 - 15:57
 0
तब्बल 25 वर्षानंतर अजिंक्य देव, अश्विनी भावे दिसणार एकत्र

मुंबई : जवर रुपेरी पडद्यावर नायक-नायिकेच्या अनेक लोकप्रिय जोड्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे.

लवकरच पुन्हा एकदा ही जोडी 'घरत गणपती' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने 'घरत गणपती' हा चित्रपट येत्या 26 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचं असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी 'घरत गणपती' चित्रपटाची निर्मिती केली आहे.

शरद घरत आणि अहिल्या घरत या व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. या चित्रपटात अजिंक्य देव कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडिल अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या करारी आईची व्यक्तिरेखा अश्विनी भावे साकारणार आहेत. “याआधी 'शाब्बास सूनबाई','मायेची सावली','चल गंमत करू', 'सरकारनामा' या चित्रपटांद्वारे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावर चांगलीच खुलली आता २५ वर्षांनी 'घरत गणपती' चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमची केमिस्ट्री रसिकांना आनंद देईल,” असं हे दोघं सांगतात. चित्रपटाचा सुंदर विषय आणि आमचं काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:02 13-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow