खेड : भरणे- जाधववाडी येथील बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणात आदिवासी व्यक्तीचा सहभाग?; वनविभागाकडून तपास सुरु

Jun 14, 2024 - 12:05
Jun 14, 2024 - 14:05
 0
खेड : भरणे- जाधववाडी येथील बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणात आदिवासी व्यक्तीचा सहभाग?; वनविभागाकडून तपास सुरु

खेड : तालुक्यातील भरणे- जाधववाडी येथे बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणी वनविभागाच्या पथकाने अटक केलेल्या संशयितांकडून महत्त्वाची माहिती वनविभागाच्या हाती लागली असून या प्रकणात एका आदिवासी व्यक्तीचा महत्त्वाचा सहभाग असून, त्या आदिवासीचा शोध घेण्यासाठी वनविभागाने आता तपास गतिमान केला आहे. 

चिपळूण वनविभागाच्या पथकाने बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणात आता मुळापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापूर्वी दिलीप कडलग (घाटकोपर- मुंबई), अतुल दांडेकर (चेंबूर - मुंबई), विनोद कदम (सावर्डे-चिपळूण), सचिन गुरव (गोविळ-लांजा) यांना गजाआड केले आहे. या चौघांकडून ६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्यामध्ये बिबट्याच्या ८ नखांचा देखील समावेश आहे. तस्करीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा व दुचाकी देखील वनविभागाने जप्त केली आहे. या बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणात लांजा तालुक्यातील गोविळ येथे वास्तव्यास असलेला सचिन रमेश गुरव हाच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याने चार ते पाच वर्षापूर्वी तेथे वास्तव्यास आलेल्या एका आदिवासी व्यक्तीकडून बिबट्याची ८ नखे खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार त्या आदिवासी व्यक्तीने बिबट्याची नेमकी कुठे शिकार केली, याचा शोध वनविभागाच्या पथकाकडून घेतला जात आहे. अधिक तपास विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे परीक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील, खेडचे वनपाल सुरेश उपरे व त्यांचे सहकारी करत आहेत.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 14-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow