लांजा : बेर्डेवाडी येथील धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू

Jun 17, 2024 - 09:56
 0
लांजा : बेर्डेवाडी येथील धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू

लांजा : लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्याखाली कळसवली राजापूर येथील एक तरुण बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 2 च्या दरम्यान घडली. प्रथमेश दत्ताराम तळेकर, (26, राहणार कळसवली ता. राजापूर) हा तरूण मृत झाला आहे. कळसवली राजापूर येथील 7-8 तरुण मुंबईहून गावी आले होते. रविवारी ही तरुण मंडळी वेरवली बेर्डेवाडी धरणाच्या धबधब्याजवळ अंघोळ करत होते. धबधब्यात आंघोळ करताना एकजण पाय घसरून बुडाला. उशिरापर्यंत पाण्यातून वरती न आल्याने इतर तरुणांची धावपळ झाली. सुमारे दोन तासांनी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.

वेरवली बुद्रुक येथील प्रभाकर कुलये पोलीस पाटील यांना या घटनेची खबर देण्यात आली. लांजा पोलीस निरीक्षक मारुती घुटुकडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी 4 वाजता मृतदेह धबधब्याच्या डोहातून बाहेर काढून लांजा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला. 

वेरिवली बेर्डे वाडी धरणाचे वाढीव पाणी सांडव्यातून सोडण्यात आल्याने धबधबा कार्यान्वित झालेला आहे. हा धबधबा अतिशय धोकादायक आहे. या धधबधब्याकडे न जाण्याचे मनाई आदेश आहेत. हे तरुणे या ठिकाणी मौज मस्ती करत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक मारुती घुटुकडे करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 17-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow