फ्रेंडसर्कल हिंदवी कबड्डी संघातील खेळाडूंनी केली मार्लेश्वर तीर्थक्षेत्राची स्वच्छता

Jun 5, 2024 - 15:00
 0
फ्रेंडसर्कल हिंदवी कबड्डी संघातील खेळाडूंनी केली मार्लेश्वर तीर्थक्षेत्राची स्वच्छता

साडवली : देवरूखजवळील प्रसिद्ध मार्लेश्वर या पर्यटनस्थळी भाविक, पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे परिसर बकाल झाला होता. ही दुरवस्था पाहून देवरूख येथील फ्रेंडसर्कल हिंदवी कबड्डी संघातील खेळाडूंनी मार्लेश्वर येथे स्वच्छतामोहीम राबवली. प्लास्टिक रॅपर, बाटल्या, अन्य वस्तू गोळा केल्या.

मार्लेश्वर धबधबा परिसर, कंरबेळी डोह, मंदिर परिसर, दुकाने या ठिकाणी दिवसभर मोहीम राबवली. संघातील १० कबड्डीपटूंनी यात सहभाग नोंदवला. भाविक व पर्यटक यांनी खरेतर कचरा इतरत्र न टाकता डस्टबिनमध्ये टाकायला हवा. देवस्थान कमिटी, मारळ ग्रामपंचायत व व्यापारीवगनि तशी सोय करणे गरजेचे आहे; मात्र तसे होताना दिसत नाही. मार्लेश्वर धारेश्वर धबधबा हा नदीचे रूप धारण करतो. या नदीत हा सगळा कचरा साचला जातो. तसेच या ठिकाणी असणारे पशूपक्षी, वानरांना यापासून धोका होऊ शकतो. देवस्थान कमिटीने व व्यापारी, ग्रामपंचायत यांनी हे पर्यटनस्थळ स्वच्छतेकडे जागरूकतेने लक्ष दिले पाहिजे. देवरूखचे दक्ष नागरिक गणेश खामकर व इतर संघटनांनी दिलेले डस्टबिन गायब झालेले दिसत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 05/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow