PM-KISAN 17th instalment : पीएम किसानचा 17 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

Jun 18, 2024 - 11:27
 0
PM-KISAN 17th instalment : पीएम किसानचा 17 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंगळवारी ( १८ जून) पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जारी करण्यात येणार आहे. वाराणसी येथील सभेतून देशातील ९.२६ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास २० हजार कोटी रुपये वितरीत करण्यात येणार असल्याचे  वृत्त आहे.  

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी मंगळवारी त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. येथील शेतकरी सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. या प्रसंगीच पंतप्रधान मोदी केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जमा करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 18-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow