खेड पंचायत समितीवर माजी आ. संजय कदम यांची धडक

Jun 18, 2024 - 12:10
 0
खेड पंचायत समितीवर  माजी आ. संजय कदम  यांची  धडक

खेड : माजी आमदार तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आ. तथा जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी शुक्रवारी १४ रोजी खेड पंचायत समितीमध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पंचायत समितीच्या कामकाजावर टीका करत आक्रमक झालेल्या कदम यांनी यावेळी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

खेड पंचायत समिती गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, तसेच आरोग्य अधिकारी यांना शुक्रवारी १४ रोजी माजी आमदार संजय कदम यांनी धारेवर धरले. यावेळी ते म्हणाले, काही महिन्यांपूर्वी लंपी रोगामुळे दगावलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे ऐन पेरणीच्या कालावधीत शेतकऱ्यांकडे बैल उपलब्ध नाहीत, तसेच वारंवा कृषी विभागाच्या कार्यालयाच्या फेऱ्या मारून देखील निधी नाही, म्हणून पैसे देऊ शकत नसल्याचे सांगण्यात येते बैल नाही तर शेतकरी शेती करणा कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कृषी विभागामार्फत अवकाळी पावसामध्ये आंबा बागायतदारांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले गेले नाहीत. याचा कदम यांनी निषेध व्यक्त केला. जिल्ह्यातल्या आरोग्य विभाग अंतर्गत ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रामधील रुग्णवाहिका चालकांन गेल्या कित्येक दिवसांपासून पगार मिळाल्यामुळे त्यांनी काम बंद केले आहे. आरोग्य विभागाचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याचे कदम म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 18/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow