रत्नागिरी : हयातनगर येथे घरफोडी; ८२ हजारांचा ऐवज लंपास

Jun 18, 2024 - 12:35
 0
रत्नागिरी : हयातनगर येथे घरफोडी; ८२ हजारांचा ऐवज लंपास

रत्नागिरी : शहरातील हयातनगर येथील सदनिका फोडून अज्ञाताने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. घरफोडीची ही घटना गुरुवार, दि. १३ जून रोजी सकाळी १०.३० ते शनिवार, दि. १५ जून रोजी सकाळी १० वा. या कालावधीत घडली आहे.

या बाबत सफुरा जाविद यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, त्या कुटुंबियांसोबत बाहेरगावी गेल्या होत्या. शनिवारी सकाळी त्या परतल्या असता त्यांना आपल्या सदनिकेचे पुढील लाकडी दरवाजाचे कुलुप तोडलेले दिसून आले. त्यांनी आतमध्ये जाउन पाहिले असता त्यांना बेडरुमधील बेडमध्ये ठेवलेल्या ज्वेलरी बॉक्समधील सोन्याची बांगडी, सोन्याचे कानातील जोड, सोन्याच्या दोन अंगठ्या आणि रोख ९ हजार रुपये असा एकूण ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 18-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow