मिर्‍या येथे समुद्रात मासे गरवण्यासाठी गेलेल्या पानवल येथील तरुणाचा बुडून मृत्यू

Jun 18, 2024 - 12:38
 0
मिर्‍या येथे समुद्रात मासे गरवण्यासाठी गेलेल्या पानवल येथील तरुणाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिर्‍या येथे मासे गरवण्यासाठी गेलेला पानवल येथील राहूल शाम घवाळी ( 24 रा. पानवल, रत्नागिरी) हा तरुण समुद्राच्या पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना सोमवार 17 जून रोजी दुपारी 3.45 वा. सुमारास घडली. त्याचा मृतदेह रात्री उशिरा त्याच ठिकाणी मिळाला आहे.

सोमवारी दुपारी पानवल आणि चरवेली येथील राहुल राजेंद्र शिंदे (24), दिगंबर अनंत गराटे (20) (दोघे रा. चरवेली, रत्नागिरी) व राहूल घवाळी ( 24 रा. पानवल, रत्नागिरी) हे तिन तरुण दुपारी मिर्‍याबंदर येथील भारती शिपयार्ड कंपनीच्या पाठीमागील खडपात मासे गरविण्यासाठी गेले होते. तेव्हा राहूल घवाळी मासे गरवत असताना अचानक आलेल्या लाटेत फसला तो पण्यात ओढला जाऊ लागला. त्यावेळी राहुल शिंदेने त्याला वाचवण्याचा अथक प्रयत्न केला. पाण्याच्या लाटेत वाहत जाणार्‍या राहूल घवाळीने राहुल शिंदे याने पाण्यात टाकलेली मासे गरविण्याची स्टिकही पकडली होती; पण पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की तो वाहून गेला.

राहुलच्या सोबत असलेल्या या दोन मित्रांनी आरडा-ओरडा केल्यानंतर मिर्‍या येथील काही ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी राहुलच्या सोबत असलेल्या मित्रांनी घटनेची खबर शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले , त्याचा शोध घेतला असता रात्री त्याच ठिकाणी राहुलचा मृतदेह सापडला.

दरम्यान, या घटनेचा धक्का बसल्याने राहूलचा घवाळीचा मित्र राहुल शिंदे बेशूध्द पडला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. सायंकाळी उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात तरुणांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. तसेच वाहून गेलेल्या राहूल घवाळीचा पोलिसांकडून रात्री उशिरा पर्यत शोध सुरु होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 18-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow