रत्नागिरी : 'पीएम किसान' योजनेपासून लाभार्थी शेतकरी वंचित

Jun 18, 2024 - 15:36
 0
रत्नागिरी : 'पीएम किसान' योजनेपासून लाभार्थी शेतकरी वंचित

रत्नागिरी : कृषी खात्याकडे तालुकापातळीवर पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रारी दाखल आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यांना अजून लाभार्थी करून घेण्यात आलेले नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सरपंच, सदस्यदेखील प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे अनेक गावांतील छोटे शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित राहत आहेत.

प्रत्येक तालुक्याला असणाऱ्या कृषी कार्यालयामध्ये त्या तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार केली जाते. वर्षभरापूर्वी सर्वसाधारण शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयांमध्ये तयार करण्यात आली. त्याप्रमाणे पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळू लागला. २००० रुपये इतके सहाय्य ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते.

मात्र, कृषी खात्याच्या प्रशासकीय विभागाने याद्यांची फेरतपासणी करताना अनेक गरजू शेतकऱ्यांना या यादीतून वगळले आहे. सधन आंबा बागायतदार, शेतकरीदेखील या योजनेचे लाभार्थी आहेत; पण प्रत्यक्षात छोट्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही, असे आढळून आले आहे. कृषी खात्याकडे तालुकापातळीवर पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे अनेक गावांतील छोटे शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित राहत आहेत.

याद्यांची फेरतपासणी करावी
गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी याद्यांची फेरतपासणी करावी आणि त्यांचे नाव पीएम किसान योजनेच्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 18/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow