खेड : नातूवाडी धरणाच्या कामांची स्वतंत्र चौकशीची मागणी

Jun 19, 2024 - 10:44
Jun 19, 2024 - 10:45
 0
खेड : नातूवाडी धरणाच्या कामांची स्वतंत्र चौकशीची  मागणी

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील नातूवाडी धरणामध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या झालेल्या विविध कामातील गैरव्यकहार प्रकरणी स्वतंत्र चौकशी होण्याची लेखी मागणी उद्योजक तसेच प्रगतशील शेतकरी सदानंद ऊर्फ आप्पा कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सदानंद ऊर्फ आप्पा कदम यांनी नातूवाडी धरणाच्या गैव्यकहार प्रकरणाच्या चौकशीची मागणी केल्यानंतर पाटबंधारे विभागासह ठेकेदारांचे देखील धाबे चांगलेच दणाणले आहेत. हे धरण म्हणजे अधिकारी आणि ठेकेदारांच्या भ्रष्टाचाराचे कुरण झाले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. 

सदानंद ऊर्फ आप्पा कदम यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीनुसार खेड तालुक्यातील नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या कामांमध्ये कोट्यवधींच्या रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे म्हटले आहे. मंजूर झालेल्या विविध कामांच्या कारभारामध्ये तसेच देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्यक्षात कोणतीही कामे न करता बिले काढण्यात आले आहेत. परस्पर शासकीय निधीचा संबंधित ठेकेदार आणि अभियंता यांनी संगनमत करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी लाटला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा खेड तालुक्यातील महत्वाचा प्रकल्प असून जनतेला या धरणाच्या पाण्याचा फायदा व्हावा, या हेतूने शासनाने प्रकल्प पूर्ण केला आहे. ठेकेदारांच्या गैरकारभारामुळे तसेच अभियंत्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांऐवजी ठेकेदार आणि अभियंता यांचाच या धरणामुळे मोठा फायदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा प्रकल्प म्हणजे अभियंता आणि ठेकेदार तसेच राजकीय नेत्यांचे जवळचे नावेवाईक यांचा पोट भरण्याचा धंदा झाल्याचे आप्पा कदम यांन तक्रारीत नमूद केले आहे.

खरे तर शासन स्तरावर मंजूर झालेली कामे ठेकेदार संबंधित पाटबंधारे विभागाचे अभियंता यांना 'मॅनेज' करून कुठेही शासकीय निविदा न काढता त्यांच्याकडून कार्यारंभ आदेश काढून घेतात. ही माहिती संबंधित कार्यकारी अभियंता यांच्याकडून माहिती अधिकारात प्राप्त झाली असून येथे काढता राजकीय बळाचा वापर करून मंजूर कामांचे वाटप केले जात असल्याचा आरोप देखील दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्याचबरोबर निविदा प्रक्रिया जो पारदर्शक व्हायला हवी. मात्र, तेथे कायमच राजकीय दबाव ठेवून ही प्रक्रिया पार पाडली जाते कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर होतात; मात्र त्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.

या कालावधीतील कामांची व्हावी चौकशी
खोड तालुक्यातील सर्वात महत्वाचे आणि संपूर्ण तालुक्याची तहान भागवणाऱ्या या नातूवाडी धरणाच्या २०१३/१४ ते मे २०२४ या कालावधीत करण्यात आलेल्या नातूनवाडी धरणाच्या सर्व कामांची स्वतंत्र चौकशी करून शासनाचा आर्थिक निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी उद्योजक तसेच प्रगतशील शेतकरी सदानंद आप्पा कदम यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 19/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow