रेल्वे प्रवाशांच्या मदतीला धावली संपर्क युनिक फाउंडेशन

Jul 16, 2024 - 10:01
 0
रेल्वे प्रवाशांच्या मदतीला धावली संपर्क युनिक फाउंडेशन

रत्नागिरी :  मुसळधार पाऊस आणि रेल्वे रुळावर पडलेल्या मातीमुळे कोकण रेल्वे सेवा तब्बल 26 तास खंडीत होती. रविवार सायंकाळी 4.30 वाजल्यापासून जनशताब्दी,मांडवी,तेजस आणि कोकणकन्या ह्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांचे प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्टेशन वर अडकून पडले होते. या वेळी पालकमंत्री मा उदयजी सामंत यांनी तातडीने रेल्वे स्टेशन वर जावून प्रवाशांची सोय केली.

सोमवारी सकाळी या अडकून बसलेल्या प्रवाशांना पनवेल पर्यंत नेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला, पोलिस प्रशासन, कोकण रेल्वे प्रशासन आणि महामंडळ यांच्या सोबत काम करण्यासाठी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ची टीम सोमवारी सकाळी रत्नागिरी रेल्वे स्टेशन वर पोहोचली.स्टेशनवर सुमारे 3000 प्रवासी आपली लहान मुले, वृध्द आणि कुटुंबीयांसह त्रासलेले होते, त्यावेळी प्रशासना सोबत संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर, सल्लागार सुहेल मुकादम, सचिन शिंदे, जयदीप परांजपे, अभिजित जाधव,जया डावर, देवेंद्र डावर आदींनी भर पावसात सुमारे 7 तास अविरत काम करुन महामंडळाच्या 40 एस टी बस मध्ये या प्रवाशांना बसवून पनवेल पर्यंत जाण्यासाठी मदत केली.यावेळी लायन्स क्लब च्या वतीने प्रवाशांना जेवणाची सोय करण्यात आली होती.

सुमारे 26 तासानंतर आपली सुटका झाल्याने सर्व प्रवाशांनी प्रशासन सह संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे आभार मानले. रत्नागिरी जिल्ह्यातील संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ही कोठेही आपत्तीजनक घटना घडली तर लगेच धावून जाते, आजही या संस्थेने दाखवलेल्या मानवतेच्या भावनेला अनेकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 16/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow