मोदीजी एक शब्द बोलले तर तुम्हाला लागला, पवारांनी आधी मविआचे नेते मोदींना काय बोलले याचा अभ्यास करावा : चंद्रशेखर बावनकुळे

Jun 19, 2024 - 14:43
 0
मोदीजी एक शब्द बोलले तर तुम्हाला लागला, पवारांनी आधी मविआचे नेते मोदींना काय बोलले याचा अभ्यास करावा : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलले तर तुम्हाला तो एवढा लागला. मात्र मविआचे नेते मागील काही वर्षात मोदीजींवर मोठ्या प्रमाणात टीका करत आहे. खालच्या भाषेत मोदीजींवर टीका केलीय, वैयक्तिक स्वरूपात टीका टिपणी केलीय.

शरद पवार यांनी याचा आकलन केलं पाहिजे. एखादा शब्द पंतप्रधान मोदी बोलले तर तुम्हाला एवढा का लागला. असा प्रश्न उपस्थीत करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे.

मोदींजींना एखादा शब्द बोलला तर तो तुम्हाला लागला, मात्र तुम्ही गेल्या दीड वर्षापासून काय काय बोलताय, त्याची नोंद महाराष्ट्रीतल जनेतेनेत घेतली आहे. अत्यंत तुच्छ आणि गलिच्छ पद्धतीचे राजकारण मविआच्या नेत्यांनी केले आहे. थोड्या यशाने ते हुरळून गेले आहेत. त्यामुळे पवारांनी देखील मविआच्या नेत्यांच्या वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा थोडा अभ्यास करावा, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस सरकारमध्येच राहतील - चंद्रशेखर बावनकुळे

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेला मदत करावी, अशी विनंती केली आहे. त्यांनी ती विनंती मान्यही केली आहे, असे आम्ही समजतो. तसेच केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली आहे, असे आम्ही समजतो. महायुतीचे सरकार लोकांसाठी काम करेल यासाठी त्यांनी सरकारमध्ये असणे आवश्यक आहे. महायुतीच्या सर्वच नेत्याबद्दल मी असे म्हणेल सर्वांनी चांगलं काम करायचे आहे. अजित दादाबद्दल आमच्याकडून काहीही बोलल्या गेले नाही. ज्यांनी कोणी त्यांच्या बद्दल बोललं असेल त्यांना ते लखलाभ असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना दिली.

छगन भुजबळ यांच्या भूमिकेबद्दल त्यांनाच आता विचारावे लागेल

तसेच छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चेबाबत विकरले असता बावनकुळे म्हणाले की, छगन भुजबळ यांनाच आता विचारावे लागेल की त्यांची नाराजी काय, त्यांच्या भूमिकेबद्दल मी काही मत व्यक्त करणे हे योग्य नाही. असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिक भाष्य करणे टाळले आहे. काल पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रात अवघे 0.3 टक्के कमी मत मिळाले आहेत. या पराभवाचे कारण काय, जिथे कमी पडलो तिथं अधिकचे काम आम्ही करू. भविष्यात कुठेही कमी पडू नये, यासाठी आम्ही अधिक काम सध्या करत आहोत. महायुतीला मतदारांनी मोठी साथ दिली आहे. त्या मतदाराचे आभार मानण्यासाठी धन्यवाद यात्रा महाराष्ट्रमध्ये काढणार आहोत. ज्यांनी मत दिले आणि ज्यांनी मत नाही दिले त्यांचेही या यात्रेतून आभार मानणार असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

इंग्रजांचा काळ काँग्रेसने आणला- चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इतक्या खालच्या पातळीला गेले आहेत की ते शेतकऱ्यांकडून पाय धुवान घेत आहेत. हे कृत्य महाराष्ट्राला अशोभनीय असून इंग्रजांचा काळ काँग्रेसने आणला आहे. त्या काळातील मानसिकता नाना पटोलेंमध्ये उतरली आहे. नाना पटोले यांनी पदाचा अपमान केलेला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. अशी बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंवर केली आहे. आपण 21व्या शतकात जगत आहोत आणि आज हे कुठे चालले आहे. तसेच आपण काय संदेश समाजाला देतोय.पाय धुणार असो की धुवून घेणारा. हे कृत्य अशोभनीय असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 19-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow