चिपळूण : महामार्गावरील वहाळ अंडरपासची एक लेन वाहतुकीसाठी बंद

Jun 20, 2024 - 10:53
Jun 20, 2024 - 10:58
 0
चिपळूण : महामार्गावरील वहाळ अंडरपासची एक लेन वाहतुकीसाठी बंद

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे वहाळ फाटा येथील अंडरपासचा भराव खचून काँक्रिटीकरण केलेला रस्ता खचल्याने या ठिकाणची एक लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या लेनवरून दुतर्फा वाहतूक सुरू असून सर्व्हिस रोडवरूनदेखील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

याचवर्षी मे अखेरपर्यंत वहाळ फाटा येथील अंडरपासचे काम पूर्ण करण्याचे ध्येय ठेवून भरावाचे काम अतिवेगाने करण्यात आले. याचा परिणाम म्हणून पावसाळ्यामध्ये येथील अंडरपासचा भराव खचला आहे.

संबंधित ठेकेदार कंपनीने याची तत्काळ दखल घेत या ठिकाणी जेसीबी व ब्रेकर लावून खचलेला काँक्रिटीकरणाचा भाग काढण्याचे काम सुरू आहे.

नव्याने या ठिकाणी रोलिंग करून काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर वाहतूक दुसऱ्या लेनवरून वळविण्यात आली असून सर्व्हिस रोडदेखील वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 20/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow