देवरूख-साखरपा मार्गावर इको व हुंडई आँरा यांच्यात धडक; ११ जण जखमी

Jun 8, 2024 - 10:54
 0
देवरूख-साखरपा मार्गावर इको व हुंडई आँरा यांच्यात धडक; ११ जण जखमी

देवरूख : देवरूख-साखरपा मार्गावरील पर्शरामवाडी फाटानजीक इको व हुंडई आँरा यांच्यात धडक होऊन मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. अपघातानंतर प्रवासी आतमध्ये अडकले होते. स्थानिक तरुण, वाहनचालकांनी काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात ११ जण जखमी झाले.

या मार्गावर मंगळवारी दुपारी १२ च्या दरम्यान इको (गाडी एमएच-४३, बीयु-८४३९) व हुंडाई ऑरा (गाडी क्र. एमएच ०३, डीयू-१०९४) यांच्यात धडक होऊन अपघात घडला. इकोमधील प्रवासी हे चिपळूण येथील आहेत तर ऑरा गाडीतील प्रवासी मालवण येथील असून ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. अपघातातील इको गाडी उलटून चाके वर झाली होती.

प्रवासी मदतीसाठी आकांत करत होते स्थानिक तरुण व वाहनचालकांन समयसूचकता दाखवत गाडीच्या काच फोडून प्रवाशांना सुखरूप बाहे काढले. इको व ऑरा वाहनातील जखमींना तत्काळ देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमध्ये पर्वणी आनंद दळवी (१८), मेधा अनिल दळवी (१७), पूर्वा अनिल दळवी (४२), ऋषी अनंत दळवी (२१) अनिल विष्णू दळवी (४८), सार्थ रूपम पाटणे (३५), अरुण अरविंध रेडीज (७५), सोनल अतुल लार (४९), पार्थ अतुल लाड (२५) भास्कर अरविंद रेडीज (४५) अरविंद लक्ष्मण रेडीज (८०) यांच समावेश असल्याची माहिती देवरूख ग्रामीण रुग्णालयातून प्राप्त झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 08/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow