सीबीएसई बोर्ड दहावी-बारावीच्या दोन परीक्षा वर्षातून घेणार

Jul 3, 2024 - 11:21
Jul 3, 2024 - 12:26
 0
सीबीएसई बोर्ड दहावी-बारावीच्या दोन परीक्षा वर्षातून घेणार

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनवेळा घेतल्या जातील, असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून वारंवार सांगितले जात आहे. परंतु, आता ही परीक्षा 'जैसे थे' म्हणजे वर्षातून एकदाच होणार, अशा स्वरूपाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यावर आता सीबीएसई बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. फेक न्यूजपासून सावध राहण्याचा सल्ला सीबीएसईकडून देण्यात आला आहे. यासंदर्भात एका संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या बातमीचा हवाला दिला आहे. ही बातमी ३० जून रोजी प्रसिद्ध झाली होती. तिचा मथळा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा होऊ शकत नाहीत, असा होता. यासारख्या बातम्या निराधार असल्याचे सीबीएसई बोर्डाने घोषित केले आहे. दरम्यान, नवीन पॅटर्नची पहिली बोर्ड परीक्षा जानेवारी २०२६ मध्ये आणि त्याच सत्राची दुसरी परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 03/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow