रत्नागिरी : जिल्ह्यात ५ लाख ८० हजार स्मार्ट मीटर बसवणार

Jun 20, 2024 - 12:17
Jun 20, 2024 - 17:31
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात ५ लाख ८० हजार स्मार्ट मीटर बसवणार

रत्नागिरी : केंद्र शासनाची पुनर्गठित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत ६९६ कोटींचा केंद्राचा प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यामधून मोबाईलप्रमाणे आता बीज मीटरही रिचार्ज करता येणार आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ही सेवा सुरू होणार आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात २८४ फिडर आणि ७ हजार ट्रान्स्फॉर्मरवर स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील ५ लाख ८० हजार ग्राहकांची जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची ही योजना आहे.

केंद्र शासनाची पुनर्गठित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) जिल्ह्यासाठी मंजूर झाली आहे. ६९६ कोटींचा हा प्रकल्प आहे. या योजनेंतर्गत महावितरणच्या वितरण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र सुधारणा होणार आहे. अनेक त्रुटी दूर करून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने योजना राबविली जाणार आहे. नुकतीच या योजनेला मंजुरी मिळाली आहे. या योजनेमध्येच स्मार्ट मीटरचा समावेश आहे. महावितरण कंपनीनेही कालानुरूप आपल्या सेवेमध्ये मोठा बदल सुरू केला आहे. आधुनिकतेची कास धरत ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न आहे.

केंद्र शासनाने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सर्व व्यवहार ऑनलाईन केले आहेत. त्यामध्ये महावितरणदेखील मागे नाही. महावितरण कंपनीने आता नवीन स्मार्ट मीटर आणले आहेत. राज्यात काही जिल्हयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर त्याचा वापर सुरू झाला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यासाठीही ही स्मार्ट मीटर आरडीएसएस योजनेंतर्गत मंजूर झाले आहेत. परंतु, पहिल्या टप्प्यात हे मीटर २८४ फिडर आणि ७ हजार ट्रान्स्फॉर्मरवर बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील ५ लाख ८० हजार ग्राहकांची जुने मीटर केंद्र शासनाच्या या स्मार्ट मीटर योजनेंतर्गत ५ लाख ८० हजार मीटर बसवण्यात येणार आहेत.

केंद्र शासनाची आरडीएसएस ही योजना मंजूर झाली आहे. यामुळे महावितरणची सेवा अधिक गतिमान होणार आहे. पहिल्या टप्प्यात या योजनेतून फिडर आणि ट्रान्स्फॉर्मरला स्मार्ट मीटर बसतील. त्यानंतर सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर देण्यात येणार असल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता एन. एस. पळसुलेदेसाई यांनी सांगितले.

बलॅन्स संपला की, तुमच्या घरचा विद्युतपुरवठा खंडित...
केंद्र शासनाच्या या स्मार्ट मीटर योजनेंतर्गत ५ लाख ८० हजार मीटर बसवण्यात येणार आहेत. या मीटरला मोबाईलप्रमाणे कार्ड असणार आहे. मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला घरबसल्या वीज बिल भरता येणार आहे. मोबाईलप्रमाणे आपले वीज मीटर पोस्टपेड किंवा प्रीपेड सेवेने रिचार्ज करायचे आहे. तेव्हा तुम्हाला मोबाईलवरच मीटरने किती लोड घेतला आहे, किती वापर झाला आहे, किती रुपये बॅलन्स आहे, अशी माहिती मिळणार आहे. बलॅन्स संपला की, तुमच्या घरचा विद्युतपुरवठा खंडित होणार आहे. त्याचे सर्व नियंत्रण महावितरण कंपनीकडे असणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow