दापोली : दाखल्यांसाठी सेतू कार्यालयात पालकांच्या वारंवार फेऱ्या

Jun 22, 2024 - 13:04
Jun 22, 2024 - 13:09
 0
दापोली :  दाखल्यांसाठी सेतू कार्यालयात पालकांच्या  वारंवार फेऱ्या

दापोली : नवीन शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती, आणि अन्य शैक्षणिक कामांसाठी विविध दाखल्यांमध्ये उत्पन्न दाखला मुलांसाठी आवश्यक असतो. त्यासाठी मे महिन्यापासून दापोलीतील सेतू कार्यालयात पालकांची धावपळ सुरू झाली आहे.

शासन निर्णयाप्रमाणे शैक्षणिक वा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सवलती तसेच अन्य सुविधा मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयातून प्राप्त केलेले दाखले जोडणे आवश्यक असते. अनेकदा वेळेवर दाखला जमा केला नाही, या कारणामुळे प्रवेश रद्द वा सवलती रद्द होत असल्याची उदाहरणे आहेत. यामुळे आर्थिक शैक्षणिक नुकसान झाल्याचे प्रसंग घडतात. ऐनवेळी होणारी ही धावपळ टाळण्यासाठी तसेच प्रवेश प्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तालुक्यातील सेतू कार्यालयांत पालक विद्यार्थांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.

दहावीचा निकाल घोषित झाल्यामुळे आता ही संख्या अधिक वाढली आहे. अशा परिस्थितीत दाखले मिळवण्यासाठी सेतू कार्यालयात आलेल्या नागरिकांना तहसील कार्यालयातून वेळेत प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने पंधरा-पंधरा दिवस कार्यालयांच्या खेपा माराव्या लागत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे अनेकांची गैरसोय होत असून, प्रवेशात अडचणी येत आहेत. घरातील कामे, व्यवसाय सोडून नागरिकांना सेतू कार्यालयाच्या बाहेर दाखल्यासाठी दिवस दिवसभर प्रतीक्षा करावी, लागत असल्याने त्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत काही पालक हे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे या गैरसोय बाबत कैफियत मांडणार आहेत.

मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकडे अधिकारी यांनी पाहावे, दाखले वेळेत मिळतील अशी व्यवस्था करावी. - संजय कदम माजी आमदार दापोली

मागील आठवड्यात अधिकारी सुट्टीवर गेल्याने दाखले राहिले असतील. या बाबत पालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून अधिकाऱ्यांना दाखले वेळेत थम करण्याच्या सूचना केल्या आहेत. -अर्चना बोंबे तहसीलदार दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:29 PM 22/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow