रत्नागिरी तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.०४ टक्के

May 28, 2024 - 10:41
 0
रत्नागिरी तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.०४ टक्के

◼️ रत्नागिरीतील ३७ शाळांचा शंभर टक्के निकाल

रत्नागिरी : दहावीचा निकाल कोकण बोर्डाने जाहीर केला असून, रत्नागिरी तालुक्यात ५९ माध्यमिक शाळांपैकी तब्बल ३७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तालुक्यात विद्यार्थ्यांनी ३ हजार ९७८ परीक्षा दिली होती त्यातील ३ हजार ९४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तालुक्याचा निकाल ९९.०४ टक्के इतका लागला आहे.

रत्नागिरी तालुक्यात ५९ माध्यमिक शाळांमधून दहावीसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांमधून ३ हजार ९४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यात विशेष प्राविण्यासह १३८९ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १५५८, द्वितीय श्रेणीत ८२९ तर तृतीय श्रेणीत १६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

तालुक्यात ३७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये बळीराम परकर विद्यालय मालगुंड, स्वामी स्वरुपानंद विद्यामंदिर पावस, विद्यामंदिर फणसोप, दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे, जी. एम. शेट्ये हायस्कूल बसणी, मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल पाली, गुरुवर्य ए. ए. देसाई माध्य, विद्यालय हातखंबा, पोतकर गुरुजी विद्यामंदिर डोर्ले, कोतवडे इंग्लिश स्कूल कोतवडे, माध्यमिक विद्यामंदिर जयगड, ए.डी. नाईक ग्लर्स हायस्कूल बाजारपेठ रत्नागिरी, न्यू इंग्लिश स्कूल नेवरे, एम.जी. दुय्यम शिक्षा मंदिर हरचिरी उमरे, सेक्रेट हार्ड कॉन्व्हेंट हायस्कूल रत्नागिरी, न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे, श्रीमती राधालाई गोपाळ जागुरे एम.एच.यु.बी.डी. नाईक हायस्कूल साखरतर, झुलेखा दाऊद कनक्षी हायस्कूल पावस, ए. एन. देसाई सोमेश्वर विद्यालय विल्ये, श्रमिक विद्यालय शिवार आंबेरे, विश्वेश्वर विद्यामंदिर गावडेआंबेरे, राधा पी. पटवर्धन माध्यमिक विद्यालय कुर्धे, एम. एस. नाईक हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल निवळी बावनदी, शिरगाव हायस्कूल शिरगाव, गोडबोले माध्यमिक विद्यालय केळये, वेळवंड, सेक्रेट शर्ट कॉन्हेंट स्कूल उद्यमानगर, श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय देऊड, सईदा एम. एस. नाईक हायस्कूल उद्यमनगर, इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल मिरजोळे, डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल पाली, शिरीष मुरली मयेकर माध्यमिक विद्यालय रत्नागिरी, सेंट थॉमस हायस्कूल कुवारबाव, जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज इंग्लिश स्कूल नाणिज, मुकुल माधव विद्यालय गोळप रत्नागिरी, खंडाळा इंग्लिश मिडीयम स्कूल खंडाळा या शाळांचा समावेश आहे.

रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलचा निकाल ९९.२२ टक्के, फाटक हायस्कूलचा निकाल ९९.५२ टक्के, आर.बी. शिर्के हायस्कूलचा निकाल ९९.३१ टक्के इतका लागला आहे. तालुक्यातील यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 28-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow