चिपळूण : रेल्वे स्थानकात गैरसोयी; सुविधांची मागणी

Jun 24, 2024 - 10:57
Jun 24, 2024 - 15:14
 0
चिपळूण : रेल्वे स्थानकात  गैरसोयी;  सुविधांची मागणी

चिपळूण : चिपळूण हे औद्योगिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. चिपळूण रेल्वेस्थानकातून रत्नागिरी जिल्ह्यातील रेल्वे स्थानकात दैनंदिन हजारो प्रवाशांचे इतर ठिकाणी ये-जा सुरू असते. मात्र, येथील रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी चिपळूण रेल्वेस्टेशन मास्तर यांना दिले आहे.

या निवेदनात अडरेकर यांनी म्हटले आहे की, रेल्वे स्थानकातील सर्वच फलाटवर संपूर्ण परिपूर्ण निवारा शेड उभारून बसण्यासाठी व्यवस्था पहिल्या ते शेवटच्या डब्ब्यापर्यंत असावी. कारण प्रवासी भरपावसात आणि उन्हात उभे असतात. रेल्वे स्थानकात शौचालयाची स्वच्छता, तसेच रेल्वेगाडी कुठल्या फलाटावर येणार याचे नियोजन करणे, अपंग व महिलांना कमित कमी गैरसोयीला सामोरे जावे लागावे, सुसज्ज प्रतीक्षालय, कॅन्टीन आदी सुविधा असाव्यात.

रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूने स्थानकपासून मुख्य रस्त्यापर्यंत स्ट्रीट लाईट असावी. रात्री अपरात्री सर्वच प्रवाशांना विशेषतः महिलांना सुरक्षित प्रवास करणे सुलभ होईल. वरील मागण्यांचा संवेदनशीलतेने विचार करून त्याबाबत योग्य आणि उचित निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणी मुराद अडरेकर यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 24/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow