AFG vs BAN: अफगाणिस्तानचा थरारक विजय; टी-२० वर्ल्डकपमधून ऑस्ट्रेलिया आऊट

Jun 25, 2024 - 10:38
 0
AFG vs BAN: अफगाणिस्तानचा थरारक विजय; टी-२० वर्ल्डकपमधून ऑस्ट्रेलिया आऊट

आरोन व्हॅले स्टेडियम: टी-२० वर्ल्डकप २०२४मधील सेमी फायनलच्या दृष्टीने महत्वाचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध बांगलादेश यांच्यात रंगला.आरोन व्हॅले स्टेडियमवर अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघ केवळ २० षटकात ५ बळी गमावून केवळ ११५ धावाच करू शकला. लक्ष्याचा पाठलाग करताना सामन्यात पाऊस आला आणि सामना थोडा उशिराने सुरु झाला डीएलएस पद्धतीनुसार बंगालदेशला १९ षटकात ११४ धावांचे लक्ष्य देण्यात आले. अफगाणिस्तानने या अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशकडून सामना हिसकावून ८ धावांनी दमदार विजय मिळवला आणि सेमीफायनल फेरी गाठली. बांगलादेशच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया आता वर्ल्डकपमधून बाहेर.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने दमदार सुरुवात केली. अफगाणिस्तानच्या सलामी फलंदाजांनी पाहिल्या विकेटसाठी ५९ धावांची शानदार भागीदारी केली. रहमानुल्लाह गुरबाझने ३ चौकार आणि १ षटकराच्या मदतीने सर्वाधिक ४३ धाव केल्या. इब्राहिम झारदानने १८ धावा केल्या तर अझमातुल्लाह ओमरझाई १० धावा करून बाद झाला. गुलाबदिन नायबने ४ धावा केल्या तर मोहम्मद नबी केवळ १ च धावा करू शकला. करीम जनतने नाबाद ७ तर कर्णधार रशीद खानने नाबाद १७ धावा केल्या आणि ११५ इतकी धावसंख्या उभारली.

लक्ष्याचा पाठलाग करताना पावसामुळे उशिरा सामना सुरु झाला आणि त्यामुळे बांगलादेशला डीएलएस पद्धतीनुसार बंगालदेशला १९ षटकात ११४ धावांचे लक्ष्य मिळाले. बांगलादेशला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला तो म्हणजे सलामीला आलेला तन्झिद हसनच्या रूपाने. तन्झिद खाते न उघडता पॅव्हेलियनकडे परतला तर सलामी फलंदाज लिटन दासने शानदार अर्धशतक ठोकले. लिटनने नाबाद सर्वाधिक ५४ धावा केल्या. कर्णधार नजमूल शांतो १ चौकरासह ५ धावा करून बाद झाला तर शकिब अल हसनला शून्यावर माघारी परतावे लागले. सोम्या सरकार १० तर तौहीद हृदय २ चौकारासह १४ धावा करून परतला. महमदुल्लाह केवळ ६ धावाच करू शकला रिशाद हुसेन खाते न उघडता माघारी परतला. तनझिम हसन साकिब ३ धावा करून बाद झाला तस्कीन अहमद २ धावा करून परतला. मुस्तफिझूर रहमान शून्य धाव करून परतला अशा रीतीने बांगलादेश संघ सर्व बाद करण्यात अफगाणिस्तान संघाला यश मिळाले.

बांगलादेशकडून रिशाद हुसेनने सर्वाधिक ३ बळी घेतले. मुस्तफिझूर रहमान आणि तस्कीन अहमद या दोघांनी प्रत्येकी १-१ बळी काढले. अफगाणिस्तानकडून सर्वाधिक ४ बळी नवीन-उल-हकने ४ घेतल्या. फझलहक फारुकी आणि गुलाबदिन नायबाने प्रत्येकी १-१ बळी काढले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 25-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow