लांजा : पालू फाटा येथील दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी
लांजा : तालुक्यातील पालू फाटा येथे शनिवारी सकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. राजेश शांताराम गुरव असे दुचाकीस्वाराचे नाव असून तो कोचरी येथून कोर्लेकडे जात असताना तोल जाऊन रस्त्यावर पडला. कोचरी येथील राजेश गुरव (वय २३) त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक (एम.एच. ०८. बीडी ६२७२) घेऊन शनिवारी सकाळी कोर्लेकडे जात होता. पालू फाटा येथे त्याचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. डोक्याला जखमा झाल्या असल्याने त्याला तातडीने रत्नागिरी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 25/Jun/2024
What's Your Reaction?