रत्नागिरी : एस.टी.च्या फेऱ्या सुरू न झाल्यास उबाठा शिवसेनेचा विद्यार्थ्यांसह आंदोलनाचा इशारा

Jun 26, 2024 - 12:06
 0
रत्नागिरी : एस.टी.च्या फेऱ्या सुरू न झाल्यास उबाठा शिवसेनेचा विद्यार्थ्यांसह आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजीकच्या ग्रामीण भागांसह अगदी तालुकाभरातील काही गावांमध्ये एस.टी. बसेसच्या कोरोनामध्ये बंद झालेल्या अनेक फेऱ्या अद्याप सुरू न झाल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. सुमारे दोन ते पाच-सहा कि.मी. पायपीट विद्यार्थ्यांना करावी लागत आहे.

बसेस फेऱ्या सुरू करण्याकडे एसटी महामंडळाने दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी आल्यानंतर उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एस.टी. महामंडळाच्या कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाने चार दिवसांत एस.टी. च्या फेऱ्या सुरू करा, अन्यथा त्या गावांतील विद्यार्थ्यांना घेऊन एसटी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा तालुकाप्रमुख बंड्या साळवींनी दिला.

रत्नागिरी तालुक्यात अनेक एस.टी. च्या फेऱ्या कोरोना काळापासून एस.टी. प्रशासनाने बंद केल्या आहेत. यातील अनेक फेऱ्या आजही ग्रामीण भागात सुरू झालेल्या नाहीत, विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेतील या बसेसच्या फेऱ्या सोयीच्या ठरत होत्या. रत्नागिरी तालुक्यातील उंबरे, हरचेरी, भोके, चिंद्रवली, मिरजोळे आदी भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करण्याची वेळ येत आहे. तसेच सार्वजनिक वा रविवार सुट्टीच्या दिवशी देखील शहरीसह ग्रामीण भागातील अनेक बसेस फेऱ्या बंद ठेवल्या जातात. त्यामुळे ग्रामस्थांना फटका बसत आहे. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात रोजगारासाठी येणारे व शाळा महाविद्यालय येथील तरुण तरुणीसाठी या बसेस सोयीस्कर ठरतात. कोरोनानंतर वाहतुकीच्या फेऱ्या कमी केल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, प्रवासी भारमान कमी असल्याचे सांगत या फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. या गैरसोयीबद्दल उबाठा शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांनी माळनाका येथील एस.टी.च्या विभागीय कार्यालयात धडक दिली. तालुकाप्रमुख बंडया साळवी यांच्या नेतृत्वाखाली उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे, माजी जि.प. सदस्य महेंद्र झापडेकर, विभागप्रमुख राकेश साळवी, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत, विभागप्रमुखा विजय देसाई, यांच्यासह हरचेरी येथील चंद्रशेखर मांडवकर, दत्ताराम इरीम, नासीर मुकारी, उंबरे तेथील विनोद उकीर्ते, आण्णा सोलीम, तसा भोके, फणसोप येथील ग्रामस्थही उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेमधील अनेक एस.टी.च्या फेऱ्या कमी भारमानाचे कारण देऊन बंद करण्यात आल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन ते सहा कि.मी.ची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे. प्रदीप साळवी शिवसेना (उबठा गट)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 26/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow