मंडणगड : २४ तासाच्या आत दुचाकी चोराला अटक

Jun 25, 2024 - 10:58
Jun 25, 2024 - 10:59
 0
मंडणगड : २४  तासाच्या आत दुचाकी चोराला अटक

मंडणगड : मंडणगड शहरातून दुचाकी चोरणाऱ्याला २४ तासाच्या आत ताब्यात घेत पोलिसांनी अटक आहे. पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे मंडणगड तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे. शहरातील सरकारी गोडाऊन येथे राजाराम महादेव लेंडे यांनी आपली हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल (एम. एच. ०८ एक्स ६१४६) ही दुचाकी उभी केली होती. दि, २३ जून २०२४ रोजी सकाळी ७ वा. ही गाडी जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. लेंडे यांनी तत्काळ मंडणगड पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास करीत रात्री १२.३० च्या सुमारास संशयित आरोपीत इरफान सिराज मोमीन (२८, रा. धुत्रोली मोहल्ला, ता. मंडणगड) याच्याकडे ही गाडी आढळली. त्याला पोलिसांनी मुद्देमालासाहित ताब्यात घेत अटक केली आहे. या गुन्ह्याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉस्टेबल दत्ताराम शांताराम बाणे करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow