द ग्रेट रवींद्र चव्हाण साहेब : उमेश कुळकर्णी

Sep 20, 2024 - 15:29
Sep 20, 2024 - 15:55
 0
द ग्रेट रवींद्र चव्हाण साहेब : उमेश कुळकर्णी

रत्नागिरी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजपाचे नेते पालघर आणि सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांचा आज वाढदिवस..  त्यांना कोटी कोटी शुभेच्छा.

मोठी माणसं खरोखर साधी असतात, कारण त्यांच्या कृतीमधून ते आपल्याला दिसून येतं. असाच अनुभव मला 2018 मध्ये तत्कालीन बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री व आत्ताचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, कोकणचे कणखर नेते, आमच्या सारख्या अनेकांचे आधारस्तंभ रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या बाबतीत आला.

2018 मध्ये आमच्या स्टेट बँक कॉलनीतील उद्योग, व्यवसायाला भेट देण्यासाठी रवींद्रजी चव्हाण साहेब आले होते. तो प्रसंग मला आजही आठवतोय. माझ्या संपर्क कार्यालयामध्ये मी ज्या खुर्चीवर बसतो त्या खुर्चीमध्ये चव्हाण साहेबांनी बसावं अशी माझी इच्छा होती तसा आग्रह मी चव्हाण साहेबांना केला, परंतु साहेबांनी माझ्या पाठीवर शाबासकी दिली आणि तुझ्या खुर्चीवर तू बस असं म्हणत त्यांनी मला खुर्चीत बसवलं. व स्वतः बाजूच्या खुर्चीत बसले. आणि आमची गप्पांची मैफिल रंगली. 

राज्यमंत्री पदी असूनही त्यांचा हा मनाचा मोठेपणा तसेच साधेपणा मनाला भावला मी एक भाजपचा सामान्य कार्यकर्ता आहे परंतु चव्हाण साहेबांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केले व भक्कम पाठिंबा दिला .त्यांचे आपल्या कार्यकर्त्यावर बारकाईने लक्ष असते याचा प्रत्यय अनेकवेळा आला.

मा. रवींद्रजी चव्हाण साहेब आपणास कुळकर्णी कुटुंबीयांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. व आपल्याला उदंड आयुष्य मिळावे ही श्री. रत्नेश्वर चरणी प्रार्थना!! -आपला उमेश

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:25 PM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow