दापोली : खेम धरणात युवक बुडाला

Jul 8, 2024 - 09:53
Jul 9, 2024 - 16:55
 0
दापोली : खेम धरणात युवक बुडाला

दापोली : दापोली तालुक्यातील हर्णे येथील खेम धरणामध्ये पोहायला गेलेल्या मित्रांपैकी कल्पेश बटावले या 19 वर्षीय युवकाचा बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.

दापोली तालुक्यातील हर्णे येथील खेम धरण हे राखण देण्याकरिता व पोहण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक जण वर्षा सहलीकरिता येत असतात. दापोली तालुक्यातील सातांबा येथील चौघेजण खेम धरणामध्ये रविवारी सायंकाळी पोहण्याकरिता गेलेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेजण बुडू लागले. मात्र तेथे उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांकडून यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले. मात्र कल्पेश बटावले हा तरूण पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. पोलीस प्रशासन बुडालेल्या मुलाचा धरणातील पाण्यात शोध घेत होते. मात्र दापोलीत कोसळणारा मुसळधार पाऊस आणि सायंकाळी झालेल्या अंधारामुळे तसेच धरणातील पाण्याची खोली मोठी असल्याने शोध कार्यात अडचणी आल्याने आता दुस-या दिवशी सोमवारी सकाळी सदर बुडालेल्याचा शोध घेण्यात येणार असल्याची माहीती दापोली महसुल प्रशासनाकडून देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 08-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow