Miss India 2024 : धुव्री पटेलनं जिंकला मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 खिताब

Sep 20, 2024 - 14:01
Sep 20, 2024 - 16:20
 0
Miss India 2024 :   धुव्री पटेलनं  जिंकला मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024  खिताब

मुंबई : धुव्री पटेल मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 ब्युटी पेजेंटची विजेती ठरली आहे. अमेरिकन तरुणी धुव्री पटेल हिने मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 चा खिताब आपल्या नावावर केला आहे.

ब्युटी पेजेंट जिंकण्याऱ्या ध्रुवी पटेलं बॉलिवूड अभिनेत्री होण्याचं स्वप्न आहे. मिस इंडिया वर्ल्डवाइड ही भारताबाहेर आयोजित करण्यात येणार एक स्पर्धा आहे.

ध्रुवी पटेल या अमेरिकेतील कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीम्सच्या विद्यार्थिनी आहे. 'मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024' चा मुकुट ध्रुवी पटेलनं जिंकला आहे. या यशामुळे ती खूप आनंदी आणि उत्साहित आहे. ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ ही भारताबाहेर सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर ध्रुवीने बॉलिवूड अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आता बॉलिवूड अभिनेत्री होण्याचं स्वप्न
न्यू जर्सीतील एडिसन येथे मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 स्पर्धा पार पडली. यामध्ये ध्रुवी पटेलनं बाजी मारली. ध्रुवी पटेलला आता हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री आणि युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफची राजदूत व्हायची इच्छा आहे. मिस इंडिया वर्ल्डवाइडचा ताज जिंकल्यानंतर ध्रुवी प्रतिक्रिया देताना म्हणाली, 'मिस इंडिया वर्ल्डवाइडचा किताब जिंकणे हा एक अभूतपूर्व सन्मान आहे. हे फक्त एक मुकुट नसून त्यापेक्षाही खूप जास्त महत्त्वाचं आहे. ध्रुवी पटेलनं पुढे सांगितलं की, यामुळे माझा वारसा, माझी मूल्ये आणि जागतिक स्तरावर पोहोचवून त्यामुळे इतरांना प्रोत्साहित देण्याची संधी मिळेल.'

स्पर्धेतील इतर विजेत्यांची नावं
मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 या स्पर्धेत सुरीनामच्या लिसा अब्दोएलहक ही पहिली उपविजेती ठरली आहे, तर नेदरलँड्सच्या मालविका शर्मा दुसरी उपविजेती ठरली आहे. मिसेस कॅटेगरीमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोची सुएने माउटेट हिने खिताब आपल्या नावावर केला आहे, तर स्नेहा नांबियार फर्स्ट रनर अप आणि युनायटेड किंगडमची पवनदीप कौर ही सेकंड रनरअप ठरली. ग्वाडेलूपच्या सिएरा सुरेटेला किशोर गटात 'मिस टीन इंडिया वर्ल्डवाइड'चा खिताब जिंकला आहे. नेदरलँडची श्रेया सिंग आणि सुरीनामची श्रद्धा टेडजो फर्स्ट आणि सेकंड रनरअप घोषित करण्यात आलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow