गुहागर : पाटपन्हाळेतील वीज खांबांचे नुकसान एसटीमुळे नाही : आगारप्रमुख सोनल कांबळे यांची माहिती

Jun 25, 2024 - 14:32
 0
गुहागर : पाटपन्हाळेतील वीज खांबांचे नुकसान एसटीमुळे नाही : आगारप्रमुख सोनल कांबळे यांची माहिती

गुहागर : पाटपन्हाळे कोंडवाड़ी येथील सर्व्हिस वायरसह वीजखांब एसटी बसने ओढत नेल्याने नुकसान झाले, असे महावितरणकडून प्राप्त झालेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, त्या प्रकाराशी गुहागर आगाराच्या बसचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया गुहागर आगारप्रमुख सोनल कांबळे यांनी दिली.

एसटी बसने सर्व्हिस वायरला तोडून तीन वीजखांब ओढत ती सुसाट निघून गेल्याचा प्रकार तालुक्यातील पाटपन्हाळे कोंडवाडी येथे गुरुवारी घडला होता. या प्रकारामुळे महावितरणचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाल्याने भरपाईबाबत महावितरणने गुहागर आगाराला याबाबत पत्र देऊन नुकसान भरपाईची मागणी केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow