सुमित कदम ठरला राधाकृष्ण 'श्री ' किताब विजेता

Aug 21, 2024 - 09:37
Aug 21, 2024 - 09:46
 0
सुमित कदम ठरला राधाकृष्ण 'श्री ' किताब विजेता

◼️ हर्षद मांडवकर बेस्ट पोझर तर फैय्याज मुल्ला ठरला उगवता तारा

रत्नागिरी : राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त वैश्ययुवा, रत्नागिरी संस्थेच्या माध्यमातून राधाकृष्ण श्री २०२४ ही जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक नामवंत स्पर्धक सहभागी झाले होते. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सुमित कदम याने मानाचा राधाकृष्ण 'श्री २०२४ चा किताब पटकावला. तर हर्षद मांडवकर बेस्ट पोझर आणि फैय्याज मुल्ला याला उगवता तारा म्हणून गौरवण्यात आले. 

राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त वैश्ययुवा संस्थेच्यावतीने राधाकृष्ण श्री २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन श्री. विकास मलुष्टे, जयप्रकाश गांधी, रविंद्र प्रसादे, श्रीनाथ खेडेकर, प्रविणशेठ मलुष्टे, लाल्याशेठ खातू, विकास खातू, जयु गांधी, रवींद्र प्रसादे, प्रवीण मलुष्टे, जितेंद्र नाचणकर, सिद्धार्थ बेनखे, वसंत भिंगार्डे, मकरंद खातू, वीरेंद्र वणजू, सौरभ मलुष्टे, गौतम बाष्टे आदी मान्यवर उपस्थित होते. 

चार गटात ही स्पर्धा खेळवण्यात आली. १६२ सेंटिमीटर उंचीच्या पहिल्या गटात महेश आंबेकर याला प्रथम क्रमांक, आतिश विचारे दुसरा क्रमांक, ओमकार कीर तृतीय, प्रणय चोरगे चौथ्या क्रमांकावर तर प्रणव कांबळी पाचव्या क्रमांकावर राहिला. १६२ सेंटिमीटर पुढील ते १६७ सेंटिमीटर उंची पर्यंतच्या दुसऱ्या गटात स्वप्नील घाटकर प्रथम क्रमांक, हर्षद मांडवकर दुसरा, सुयोग पदमुळे तिसरा, वैभव पाटील चौथा तर संजय डेरवणकर पाचव्या क्रमांकावर राहिला. 

१६७ सेंटिमीटर उंची पुढील ते १७२ सेंटिमीटर उंची पर्यंतच्या तिसऱ्या गटात सुमित कदम पहिला क्रमांक, गणेश गोसावी दुसरा, अभिनंदन सातोपे तिसरा, अमित जाधव तिसरा तर वरद झेपले पाचव्या क्रमांकावर राहिला. १७२ सेंटिमीटर उंची पुढील पाचव्या गटात फैजान मुल्ला पहिल्या क्रमांकावर, आशिष घाणेकर दुसऱ्या क्रमांकावर, समीर शिंदे तिसऱ्या तर शिवम कोकरे तिसऱ्या क्रमांकावर राहिला. 

सुमित कदम या स्पर्धेचा विजेता ठरला. स्पर्धेतील किताब विजेत्याला अभिज्ञ वणजू यांच्या हस्ते मानाचा पट्टा प्रदान करण्यात आला तसेच आकर्षक शिल्ड व रोख पारितोषिक राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू यांच्या हस्ते देण्यात आले. बक्षिस वितरणावेळी मकरंद खातू, अथर्व शेट्ये, मुकुल मलुष्टे, सौरभ मलुष्टे, सचिन केसरकर, मनोहर दळी, कुंतल खातू, साहिल रेडीज,प्रज्ञेश रेडीज, ऋषी धुंदूर, सदानंद जोशी, जीतेंद्र नाचणकर, शैलेश जाधव, नरेंद्र वणजू, वेदांत मलुष्टे, समीर रेडीज, राजू गांगण, हर्षद रेडीज, फैयाज खतीब उपस्थित होते. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या सहकार्याने घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौतम बाष्टे यांनी केले व थेट प्रक्षेपण रत्नागिरी खबरदारचे हेमंत वणजू यांनी केले. या वेळी रत्नागिरीतील जेष्ठ व्यायामपट्टू भाई विलणकर यांचा 80 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला विशेष सत्कार वैश्य युवा तर्फे विकास मलुष्टे व जयप्रकाश गांधी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी भाईंनी त्यांचा जीवनप्रवास सगळ्यांसमोर मांडला त्यावेळी सर्व क्रिडा रसिक भारावून गेले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow