चिपळूण : हॉटेलमध्ये कार घुसविल्याप्रकरणी 'त्या' कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

Jun 25, 2024 - 11:02
Jun 25, 2024 - 15:04
 0
चिपळूण :    हॉटेलमध्ये  कार  घुसविल्याप्रकरणी 'त्या' कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

चिपळूण : शहरातील ओमीज् किचन हॉटेल येथे पाण्याची बाटली न दिल्याच्या रागातून कार हॉटेलमध्ये घुसविल्याप्रकरणी खेर्डी येथील आशीर्वाद आयर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. २२ जून रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत निशा प्रवीण शिंदे या हॉटेल व्यावसायिकेने चिपळूण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. जेवणासाठी संबंधित आरोपी आला असता वेटरकडे त्याने पाण्याची बॉटल मागितली. यावेळी त्याने वेटरशी हुज्जत घातली. पाण्याची टाकी साफ केल्याने पाणी नसल्याचे सांगितले आणि बिस्लेरीची बाटली मोफत देतो असे सांगताच आरोपीला राग आला. यानंतर संबंधित आरोपीने शिवीगाळ केली. यानंतर हॉटेलच्या बाहेर जाऊन चारचाकी कार भरधाव वेगाने हॉटेलच्या दिशेने आणली. यामध्ये सुरक्षा रक्षक अनिल सुर्वे (रा. खेर्डी) यांना गाडीचा धक्का लागला. तसेच पार्किंगमधील चार दुचाकी गाड्यांना या कारची धडक बसली. त्यामुळे गाड्यांचे नुकसान झाले, तर यामध्ये निशा शिंदे यादेखील जखमी झाल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow