विधान परिषदेसाठी आज मतदान

Jun 26, 2024 - 09:45
 0
विधान परिषदेसाठी आज मतदान

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी आज (ता. २६) मतदान होत आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्यानंतर चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सुशिक्षित मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याची उत्सुकता या निवडणुकीत असेल. विशेष म्हणजे मुंबई पदवीधर मतदारसंघ २५ वर्षपिक्षा जास्त काळ शिवसेनेकडे असल्याने भाजप शिवसेनेला आव्हान देते का, हे या निवडणुकीत स्पष्ट होईल.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सुशिक्षित मतदारांचा कौल महत्त्वाचा असल्याने सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीने या चार जागांसाठी जोर लावला आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत चार जागांसाठी मतदान होईल. तर या निवडणुकीची मतमोजणी एक जुलैला होऊन निकाल जाहीर केले जातील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow