चिपळूण : विश्वासाचा गैरफायदा घेत वालोपे येथील एकाची साडेसहा लाखांची फसवणूक

Jun 26, 2024 - 10:56
 0
चिपळूण : विश्वासाचा गैरफायदा घेत वालोपे येथील एकाची साडेसहा लाखांची फसवणूक

चिपळूण : तालुक्यातील वालोपे येथे ईर्टिगा विकत घेतो असे सांगून आवश्यक तो व्यवहार न केल्याप्रकरणी एकाची साडेसहा लाखांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी दानिष यासीन जईकर (४०, रा. साठी मोहल्ला खेड व सध्या रा. मुरादपूर-चिपळूण) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

ही घटना ५ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली, तर दि. २४ जून रोजी या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या बावत शैलेश दीपक आंब्रे (रा. वालोपे गणेशवाडी) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शैलेश आंब्रे यांच्या ओळखीचे असलेले दानिष जईकर याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी स्वतःच्या मालकीची ईर्टिगा गाडी ५ फेब्रुवारी २०२४ रोजी नोटरी करार करून दिली होती. मात्र, संबंधित आरोपीने ठरल्याप्रमाणे या गाडीचे हप्ते फेडले नाहीत व ईर्टिगा गाडीचा ताबादेखील त्यांना दिला नाही. शिवाय मिळणारे उत्पन्न स्वतः साठी वापरले. विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्याने संबंधित वाहनाचे हप्तेही फेडले नाहीत व या प्रकरणी त्यांचे साडेसहा लाखांची नुकसान झाले आहे. या प्रकरणी त्यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 26-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow