रत्नागिरी : स्वा. सावरकर नाट्यगृहाच्या सोलर यंत्रणेचे काम पूर्णत्वाच्या मार्गाकडे

Jun 11, 2024 - 15:29
Jun 11, 2024 - 15:34
 0
रत्नागिरी : स्वा. सावरकर नाट्यगृहाच्या  सोलर यंत्रणेचे काम पूर्णत्वाच्या मार्गाकडे

रत्नागिरी : रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृहाची सोलर यंत्रणा बसवण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गाकडे आहे. महावितरणकडून चाचणी अहवाल आल्यानंतर ही सोलर पॅनल यंत्रणा १ जुलैपासून कार्यान्वित होणार आहे. सोलर पॅनलमुळे दरमहा ५ ते ६ हजार युनिट वीजबचत होणार आहे. त्यानुसार वीजबिलही कमी होणार असल्याचे रत्नागिरी नगर परिषदेच्या विद्युत विभागाचे अभियंता धनंजय चव्हाण यांनी सांगितले.

सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत स्वा. सावरकर नाट्यगृहाच्या छपरावर सोलर पॅनल यंत्रणा बसवण्यात आली आहे. तब्बल ७५ किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी ७६ लाख रुपयांची मंजुरी मिळालेली आहे. जून महिन्यातच हे काम पूर्ण होईल, असा विश्वास 'रनप'च्या विद्युत विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले.

नाट्यगृहातील सर्व यंत्रणा वीजेवर चालणारी असल्याने दरमहा सुमारे ७ हजार युनिट वीज वापर होत होता. त्यानुसार वीजेचे बिल भरावे लागत होते. परंतु आता ७५ किलो वॅटच्या सोलर पॅनलमुळे ९० टक्के म्हणजे ५ ते ६ हजार युनिट वीज बचत होणार आहे. हे काम पूर्ण झाले असून ती यंत्रणा सुरु करण्यासाठी आवश्यक असणारा महावितरणचा चाचणी अहवाल येणे बाकी आहे. जून महिन्यातच हा अहवाल आल्यानंतर जुलै महिन्यापासून सोलर पॅनल वीज वापरण्यास सुरु होणार असल्याचे अभियंता चव्हाण यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:56 PM 11/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow