राजापूर : महावितरण विभागावर आज धडक मोर्चा

Jun 27, 2024 - 10:28
 0
राजापूर : महावितरण विभागावर आज धडक मोर्चा

राजापूर : गेल्या काही महिन्यांपासून राजापूर तालुक्यामध्ये वीज सुविधेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे राजापूरवासिय पुरते हैराण झाले आहेत. सध्या दिवस-रात्री दीड-दोन तासाने वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. 

यासंबंधित तक्रारी केल्यानंतर महावितरण विभागाकडूनही थातूरमातूर उत्तरे देत टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह सर्वपक्षीयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महावितरण विभागाच्या अशा भोंगळ कारभाराविरोधात आज गुरूवार २७ रोजी सकाळी ११ वा. शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख दीपक नागले, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर यांच्या पुढाकाराने महावितरण विभागाच्या कार्यालयावर सर्वपक्षीयांच्या वतीने धडक मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 27-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow