मिऱ्या-नागपूर महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यात ५४ टक्के काम पूर्ण

Jun 27, 2024 - 17:23
Jun 27, 2024 - 17:30
 0
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्यात ५४ टक्के काम पूर्ण

रत्नागिरी: मिऱ्या-नागपूर या महामार्ग गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले कामाने गती घेतलेली आहे. रत्नागिरी ते दख्खन या टप्प्यातील हे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्यची अंतिम मुदत आहे. त्यादृष्टीने सद्या सुरू असलेल्या पावसाळयातील संकटावर मात करत या कालावधीतही या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत सुमारे ५४ टक्के काम पूर्णत्वास गेले आल्याची माहिती मिऱ्या-नागपूर महामार्ग प्रकल्प अधिकरी वसंत पंदेरकर यांनी दिली आाहे.

नागपूर से रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग व्हावा, अशी मागणी २००१ पासून जोर धरू लागली होती. त्यासाठी मार्च २०१३ मध्ये महामार्गाची अधिसूचना जारी झाली होती. या राज्यमार्गाचे रुपांतर चौपदरी महामार्गात करण्यासाठी खऱ्या अर्थाने सर्वेक्षण झाले. त्यानंतर रत्नागिरी मिऱ्या ते नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाला गती देण्यात आली. तुळजापूर, लातूर, अहमदपूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, बुटीबोरी एमआयडीसी, नागपूर असा पहिला टप्पा आहे. तर सोलापूर, सांगोला, कोल्हापूर, रत्नागिरी असा दुसरा टप्पा निश्तित करण्यात आला.  

दुसऱ्या टप्याच्या भूसंपादनानंतर त्याला गती देण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सन २०१५ मध्ये त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे मिऱ्या नागपूर या महामार्ग कामाला गती देण्यात आली आहे. एकूण ९३० कोटींचा हा महामार्ग प्रकल्प आहे. सध्या या महामार्गाच्या कामाला पावसामुळे लगाम लागला आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या खोदाईमुळे महामार्गावर चिखलयुक्त पाण्याचा वाहनधारकांना सामना करावा लागत आहे. नुकतेच रत्नागिरी तालुक्यातील पाली, साखरपा परिसरात महामार्गाच्या कामामुळे ग्रामस्थांना रोषाला सामोरे जावे लागले होते. त्याची दखल घेत या महामार्ग प्राधिकरणस्तरावरून निर्माण होणाऱ्या समस्या व सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यात आल्याचे प्रकल्प अधिकारी पदेरकर यांनी सांगितले.

नाणिज येथील महामार्गाच्या कामामुळे रहिवाशांच्या रहदारीत अडथळा निर्माण झालेल्या भागातील चिखलयुक्त माती जेसीबीच्या साहाय्याने उपसण्याची कार्यवाही सुरु करण्यात आल्याचे पदरकर यांनी सांगितले. मिऱ्या-नागपूर वा महामार्गाच्या रत्नागिरी टप्प्यातील हे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानुसार आतापर्यंत मिऱ्या ते दख्खन या टप्प्यातील ५४ टक्के महामार्गाचे काम पूर्णत्वास गेलेले आहे. मिऱ्या ते साखरपा या अंतरातील २६ किलोमीटरचे कॉक्रिटीकरण काम पूर्ण करण्यात आले आहे.

३५ टक्के महामार्ग वाहतुकीस योग्य 
या महामार्गासाठी आवश्यक असलेला ७८ टक्के भराव टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. महामार्गाचे सपाटीकरण करण्याचे काम ७३ टक्के झालेले आहे. कॉक्रिटीकरणाखाली असलेल्या लेअर टाकण्याचे काप ३५ टक्के झाले आहे. महामार्गावर विविध ठिकाणी २०५ मोऱ्या बांधण्यात येणार असून, त्यांची ७६ टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. आतापर्यंत या महामार्गाच्या बांधणीत अनेक भागात डोंगर कटिंग करण्यात आलेले आहे. त्यातून ११ लाख क्युबिक मीटर माती काढण्यात आली आहे. या कामादरम्यान झालेल्या कॉक्रिटीकरणाद्वारे २५ टक्के महामार्ग वाहतुकीस योग्य करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:48 PM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow