रत्नागिरी आगारामार्फत २,८२३ मुलींना शाळेतच मिळाला एसटीचा मोफत पास

Jun 28, 2024 - 16:22
Jun 28, 2024 - 16:29
 0
रत्नागिरी आगारामार्फत  २,८२३ मुलींना  शाळेतच मिळाला एसटीचा मोफत पास

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारामार्फत मुलींकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेंतर्गत पासचे वितरण करण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत २,८२३ विद्यार्थिनींना आठ लाख २० हजार रुपयांचे पास वितरित करण्यात आले. शहरी बसवाहतुकीमध्ये पहिल्या तीन दिवसांत २१ हजार २२७ महिलांनी लाभ घेतला असून, यातून महामंडळाला एक लाख ७० हजार ६६० रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

सवलतीच्या पहिल्याच दिवशी २८५३ महिलांनी प्रवास केला. २४ला ९५८० आणि २५ जूनला ८७९४ महिलांनी शहरी वाहतुकीतून प्रवास केला. यातून पहिल्या दिवशी २५ हजार २० रु.. दुसऱ्या दिवशी ७६ हजार ५२५ रु. आणि २५ जूनला ६९ हजार ११५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच अमृतमहोत्सव योजनेत ७५, ज्येष्ठ नागरिकांनी ७५, २४ जूनला अमृत १६३, ज्येष्ठ २६४ आणि २५ जूनला अमृत १४५, २७० ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला. यातून २३ जूनला १३३५ रु., २४ जूनला ५०४५ रु., २५ जूनला ४६४० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

यावर्षीपासून विद्यार्थ्यांना मोफत पास योजनेमुळे एसटी कार्यालयात खेपा घालण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान लक्षात घेता एसटी महामंडळाने विद्यार्थिनींना मोफत पास वितरित करण्याची योजना हाती घेतली आहे. ६५ पेक्षाही अधिक पासांची संख्या असलेल्या शाळांमध्ये जाऊन एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी या मोफत पासचे वितरण करत आहेत. आतापर्यंत २८२३ विद्यार्थिनींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत पासचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, विभागीय वाहतूक अधिकारी राकेश पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक भाग्यश्री प्रभुणे, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, आदींसह अधिकारी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त....
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान लक्षात घेता एसटी महामंडळाने विद्यार्थिनींना मोफत पास वितरित करण्याची योजना हाती घेतली आहे. ६५ पेक्षाही अधिक पासांची संख्या असलेल्या शाळांमध्ये जाऊन अधिकारी या पासचे वितरण करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:49 PM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow