LPG Cylinder Price Cut : गॅस सिलिंडरच्या दरात कपात

Jul 1, 2024 - 10:47
 0
LPG Cylinder Price Cut : गॅस सिलिंडरच्या दरात कपात

मुंबई : एलपीजी सिलेंडरच्या (LPG Price Reduced) दरांत आज बदल करण्यात आले आहेत. आज एलपीजी (LPG Gas) स्वस्त झाला असून सर्वसामान्यांना काहीसा दिला मिळणार आहे. एलपीजी सिलेंडरचे (LPG Cylinder) दर 30 ते 31 रुपयांनी स्वस्त झाले असून आज 1 जुलैपासून लागू केले जाणार आहेत.

एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये झालेली घट ही 19 किलोंच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये करण्यात आलेली आहे. घरगुती सिलेंडरच्या किमतींत मात्र, कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एलपीजी सिलेंडरच्या घटलेल्या दरांचा फायदा हॉटेल व्यावसायिकांना होणार आहे.

तुमच्या शहरात एलपीजी सिलेंडर किती स्वस्त?

  • मुंबईत व्यावसायिक सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1598 रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत प्रति सिलेंडर 1629 रुपये होती.
  • राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1646 रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत 1676 रुपये प्रति सिलेंडर होती.
  • कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर 31 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1756 रुपयांचा झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत प्रति सिलेंडर 1787 रुपये होती.
  • चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 1809.50 रुपये झाला आहे. जूनमध्ये त्याची किंमत 1840.50 रुपये प्रति सिलेंडर होती.

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती 'जैसे थे'

घरगुती 14.2 किलोग्राम एलपीजी सिलेंडरच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. एलपीजी सिलेंडरचे पूर्वीचेच दर स्थिर आहेत. जाणून घ्या घरगुती सिलेंडरचे महानगरांमधील दर?

शहरं किमती
मुंबई 802.50 रुपये
दिल्ली 803 रुपये
कोलकाता 803 रुपये
चेन्नई 818.50 रुपये

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरते किंमत

देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी 14 किलो घरगुती आणि 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत निश्चित करतात. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 25.5 रुपयांची कपात करण्यात आली होती. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

ऑगस्ट 2023 पासून दिलासा

1 जून 2023 रोजी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये होती. 30 ऑगस्ट 2023 रोजी 200 रुपयांचा दिलासा मिळाला आणि किंमत 903 रुपये झाली. 9 मार्च 2024 रोजी पुन्हा एकदा सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त झाला. दरम्यान, आजपासून मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1598 रुपये झाली आहे. यापूर्वी हे 1629 रुपयांना उपलब्ध होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow