राजापुर : देशात अंमलबजावणी झालेल्या तीन कायद्याबाबत पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांचे मार्गदर्शन

Jul 2, 2024 - 11:06
Jul 2, 2024 - 14:39
 0
राजापुर : देशात अंमलबजावणी झालेल्या तीन कायद्याबाबत पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांचे मार्गदर्शन

राजापूर : सोमवारपासून देशात अंमलबजावणी झालेल्या तीन कायद्याची माहिती प्रशासनासह जनतेला व्हावी म्हणून राजापूर पोलिस ठाण्यात प्रशिक्षण कार्यशाळा झाली. राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी उपस्थितांना नवीन कायद्यांबाबत माहिती दिली. राजापूर पोलिस ठाण्यात १ जुलैला सकाळी ११ ते १ या वेळात हे प्रशिक्षण शिबिर झाले. या प्रशिक्षण शिबिरात पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण, भारती धनेश्वर, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे यांनी नवीन कायद्याची माहिती दिली तसेच दीपाली पंडित नायब तहसीलदार राजापूर, कुळये प्रांत कार्यालय राजापूर यांनी आरोग्यविषयक माहिती देऊन जनजागृती केली. यावेळी राजापूर पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील सर्व पोलिस पाटील, महिला दक्षता समितीचे सर्व सदस्य, महसूल विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, वकील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी पोलिस नाईक सचिन वीर, पो. कॉन्स्टेबल दीपक काळे, परशराम गवळी यांनी प्रयत्न केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 02/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow