कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर आरक्षण सुविधेची मागणी

Jul 2, 2024 - 12:07
Jul 2, 2024 - 15:16
 0
कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर आरक्षण सुविधेची मागणी

आरवली : कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानाकांवर रेल्वेचे आरक्षण मिळावे, अशी मागणी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी सांगितले.

रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या आरक्षणासाठी रत्नागिरी, चिपळूण अशा मोठ्या रेल्वे स्थानकावर जावे लागते. ऑनलाईन आरक्षण कन्फर्म न झाल्यास विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे काउंटर आरक्षण श्रेणे प्रवासी अधिक पसंत करीत आहेत. जवळच्या रेल्वे स्थनाकावर आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांना दूरच्या रेल्वे स्थनाकावर जाऊन आरक्षण घ्यावे लागते. यामुळे आर्थिक फटका या प्रवाशांना बसत आहे.

प्रवाशांची आरक्षणाची गैरसोय दूर व्हावी यासाठी कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच स्थनकांवर आरक्षण सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. कोकण रेल्वेच्या काही स्थनकांवर असुविधा आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी सुरक्षित आसने निवारा नाहीत, स्थनाकार अस्वछता दिसून येते, रात्रीच्या वेळी पुरेशा दिव्यांची सोय नाही यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, असा प्रवाशांचा अनुभव आहे.

प्रवाशांना सुविधा मिळाव्यात अशीही मागणी करण्यात येत आहे. याशिवाय पैसेंजर गाड्यांमध्ये अस्वछता असल्याने प्रवाशांना त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे. या गाडांमधील शौचालयात पाणी नसते, तसेच शौचालयातील दुर्गंधी यामुळे प्रवाशांना नाक मुठीत घरून प्रवास कराला लागत आहे. या दुर्गंधीचा वास पूर्ण बोगीतील प्रवाशांना घेत असते. या सगळ्या समस्याकडे लक्ष देऊन कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्याची आवश्यकता आहे. अशी आहे. प्रवाशांची अपेक्षा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून अजमेर दर्गा येथे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. थेट अजमेर येथे जाण्यासाठी मारुसागर ही रेल्वेची एकाच एक्सप्रेस गाडी आहे. या एक्सप्रेस गाडीला रत्नागिरी येथे तसेच रायगड जिल्ह्यातील वीर या स्थानकावर थांबा आहे. यामुळे चिपळूण येथे मरुसागर एक्स्प्रेस गाडीला थांबा मिळावा, अशीसी मागणी आपण रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. या संदर्भात लवकरच आ. शेखर निकम यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्री आणि खासदार राणे यांची भेट घेणार असल्याचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 02/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow